परिचय
पुढे | सुरुवात कशी करावी |
---|
परिचय
translatewiki.net या संकेतस्थळावर,आम्ही सतत,मुक्त सोत प्रकल्पांचे स्थानिकीकरण करण्यास रचना करतो व पायाभूत सुविधांचा विकास आणि लेख दस्ताऐवज मुक्त करतो. आमचे दोन टप्पे गाठण्यास आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.
आमचे प्रथम लक्ष्य हे कार्यक्षमता आहे.कार्यप्रणालीची कार्यक्षमता वाढविण्यास, आम्ही संचेतनाच्या विकास कार्यप्रणालीत एकात्मतेने भिडतो.त्या व्यतिरिक्त,स्वयंचलितरित्या भाषांतराची एकात्मता साधण्यास आम्ही साधने तयार करतो.याद्वारे भाषांतरकारांना शक्य तितके चांगले भाषांतर तयार करण्यास एकाग्रता साधता येते.
आमचे दुसरे लक्ष्य सहयोग आहे. सर्व प्रणाली एका विकिवर रचण्यात आली आहे.मिडियाविकी हे असे एक प्रसिद्ध विकी इंजिन आहे, जे सहयोगी समाज स्थापण्यास एक चौकट उपलब्ध करून देते. एखाद्या प्रकल्पामध्ये,आम्ही भाषांतरकारांना एकमेकांना तसेच भाषेचे बंधनात राहून, अनेक मार्गाने मदत करण्यास प्रोत्साहन देतो आणि आम्ही विकसक व भाषांतरकारांना आपसात बांधण्याचे काम करतो.
'प्रोग्रामिंग कसे करावे' याचे आपणास ज्ञान असण्याची गरज नाही.जर आपण विकि सॉफ्टवेअरशी अभ्यस्त असाल तर आपण translatewiki.net कसे वापरावे हे लवकरात लवकर शिकाल.यात फक्त, भाषेवर प्रभुत्व, जाल न्याहाळक व खुल्या विचारांची आवश्यकता आहे.
translatewiki.net – मिडियाविकी – चा हा ध्वजनौका प्रकल्प ३०० पेक्षा जास्त भाषांत सध्या वापरल्या जातो.Translatewiki.net यात, दर महिन्यात १०० पेक्षा जास्त भाषेत अद्यतने प्राप्त होतात.